भक्त ऐसे जाणा जे देहीं उदास ।
गेले आशापाश निवारूनि ॥१॥
विषय तो त्यांचा जाला नारायण ।
नावडे धन जन माता पिता ॥ध्रु.॥
निर्वाणीं गोविंद असे मागें पुढें ।
कांहींच सांकडें पडों नेदी ॥३॥
तुका म्हणे सत्य कर्मा व्हावें साह्य ।
घातलिया भये नर्का जाणें ॥४॥
English Meaning by M.K.Gandhi
He is a devotee who is indifferent about body, who has killed all desire, whose one object in life is (to find) Narayana, whom wealth or company or even parents will not distract, for whom whether in front or behind there is only God in difficulty, who will not allow any difficulty to cross his purpose. Tuka says: Truth guides such men in all their doings.
माझा अन्वयार्थ
जगतगुरु तुकोबाराय या ठिकाणी भक्तांची लक्षणे सांगतात किंवा भक्त कसा ओळखावा याची खुण सांगतात. देहातून उदास असणारे म्हणजेच मनातून आशापाश विसरून व स्वतःच्या शरीराबाबत ज्यांना आसक्ती नाही ते भक्त. ज्यांच्या जगण्याचा उद्देश व ध्येय हे नारायण म्हणजेच सत्कर्म झाला आहे व यामध्ये शरीराच्या गरजा किंवा मनाच्या इच्छा पूर्ण करण्याकडे ज्यांचे लक्षच नाही ते भक्त आहेत.
या नारायणाच्या भक्तीमध्ये भक्त इतके तल्लीन झाले आहेत कि त्यांना धनाची आसक्ती नाही. आपले नाव मोठे व्हावे किंवा लोकांमध्ये आपल्याला मोठे मानाचे स्थान असावे अशी कोणतीच अपेक्षा नाही. एवढेच काय तर ते आपल्या कुठुंबाच्या आणि आपल्याला अधिक प्रिय असणार्या आई वडिलांच्या मायेतून देखील मुक्त झाले आहेत.
अशा भक्तांना देव देखील विसरत नाही. त्यांच्या प्रत्येक सुख दु:खात देव स्वतः सहभागी होतो. त्यांच्यावर कोणतेही संकट येउ देत नाही व ते निवारण्यासाठी त्यांच्या मागे पुढे उभा असतो. ह्या भक्तांना तो कोणत्याही प्रकारची कमतरता भासू देत नाही.
तुकोबाराय सांगतात कि हे सत्कर्म करणारे भक्त देवाला सर्वाधिक प्रिय आहेत. ह्या भक्तांविषयी किंवा त्यांच्या सत्कार्याविषयी कोणी अफवा पसरवली व इतरांच्या मनात त्यांच्या कार्याची भीती निर्माण केली तसेच किंवा त्यांच्या कार्यात अडथळा निर्माण केला तर त्यांना नरकात जावे लागेल व नरकयातना भोगाव्या लागतील. नर्क म्हणजेच दारिद्र्य व जनाचा दुस्वास व त्यामुळे होणार्या हालआपेष्टा म्हणजेच नरक यातना असा अर्थ घ्यावा लागेल.
तात्पर्य: कोणत्याही सत्कार्यात स्वतःच्या फायद्यासाठी अडथळा आणला तर कालांतराने त्याचा त्रास अधिक पटीने आपल्यालाच भोगावा लागतो. म्हणून जमलेच तर चांगल्या कार्याला सहकार्य करा पण त्यामध्ये अडथळे आणू नका.